महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC )
- महाराष्ट्र शासनातल्या सेवेतील वर्ग 1 आणि2 अधिकारी निवडण्यासाठी राज्य पातळीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे( MPSC )राज्यसेवा परीक्षा घेतल्या जातात.
- कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु शकतो.पदवीच्या टक्केवारीची अट नसते.
- पदवी परीक्षेतील रिपीट विद्यार्थीही परीक्षा देऊ शकतो.
- ज्या वर्षी परीक्षा घेतली जाणार आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी किमान 19 आणि कमाल 33 वर्षे वय असावे लागते.
- आरक्षित वर्गातल्या विद्यार्थांकरता कमाल वयोमर्यादा 33 +5=38 अशी आहे.
- अपंगांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे करण्यात आली आहे.
- विद्यार्थांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- पोलीस खात्यातील भरतीसाठी आवश्यक ती शारीरिक पात्रताही विद्यार्थंाकडे असावी लागते.
- मुख्य टपाल कार्यालयांमध्ये अर्जासह माहितीपुस्तिका 100 रुपयांना मिळते.
- खुल्या वर्गासाठी परीक्षा फी -250 रु
- मागासवर्गासाठी परीक्षा फी-125 रु
- राज्यसेवा परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, विक्री कर अधिकारी , शिक्षणाधिकारी,मंत्रालय कक्षाधिकारी, गटविकास अधिकारी सेवांमध्ये नेमणुका दिल्या जातात.
- पूर्वपरीक्षेत 200 गुणांचा एक पेपर असतो त्याला सामान्य क्षमता चाचणी म्हणतात. त्यात विद्यार्थांने दोन तासांत 200 बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे असतात.
- प्रश्न इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमात उपलब्ध असतात.
- ही परीक्षा महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात घेतली जाते.
- पेपरच्या अभ्यासक्रम 12 आणि पदवीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतो.
ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते.
1-पूर्वपरीक्षा
यात ऑप्शनल प्रश्न असतात.
यात ऑप्शनल प्रश्न असतात.
2-मुख्य परीक्षा
वर्णनात्मक प्रश्न असतात.
वर्णनात्मक प्रश्न असतात.
3- मुलाखत
- उमेदवारचे व्यक्तिमत्व,सामाजिक राजकीय प्रश्नांचा अभ्यास,आपल्या भोवताली घडणार्या घडामोडींबाबतची जागरुकता,त्यांची निर्णय क्षमता,प्रसंगावधान याची चाचणी घेणारे प्रश्न विचारले जातात.
' तयारी MPSC ची 'चे पुढचे दोन भाग वाचण्यासाठी पुढील दोन लिंकवर क्लिक करा.
News Source :http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=50952#comments
No comments:
Post a Comment